शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

इसरखेडमध्ये तीन वर्षापासून बांधल्या गेलेत कागदावरच शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:27 PM

खामगाव :  ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मात्र प्रशासनातील भ्रष्ट वृत्तीचे अधिकारी कागदावरच शौचालय बांधून मलिदा लाटत असल्याचे वास्तव बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात आहे. 

योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्कखामगाव :  ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मात्र प्रशासनातील भ्रष्ट वृत्तीचे अधिकारी कागदावरच शौचालय बांधून मलिदा लाटत असल्याचे वास्तव बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात आहे. तालुक्यातील गटग्रामपंचायत इसरखेड अंतर्गत पिंप्री कोळी, इसरखेड येथे फक्त ४० शौचालय असून तेही खासगी बांधकाम केलेले आहेत. ८० टक्के लोक आज सुद्धा उघड्यावर शौचालयास जात आहे. शौचालय नसतांना सुद्धा ग्रामपंचायत हागणदारी मुक्त करण्यात आली आहे. हा शौचालय तपासणी करणारा अधिकारी कोण आहे? कोणाच्या शौचालयाचा सर्व्हे केला. व हागणदारी मुक्त गाव हे कोणत्या आधारावर जाहिर केले आहे. आॅनलाईन यादीमध्ये खोटे शौचालय दाखवून अनुदानाचा पैसा कुणी हडप केला आहे. आॅनलाईन यादीमध्ये ज्या लोकांची नावे आहेत. त्यांच्याकडे शौचालय नसतांना त्यांच्या नावावर अनुदान काढण्यात आले आहे. परंतू लाभ धारकांना एक पैसा सुद्धा मिळाला नसल्याचे संबधितांचा आरोप आहे. अनुदानाची रक्कम कुठे गेली व गाव हागणदारीमुक्त कसे झाले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इसरखेड, पिंप्री कोळी, नवीन इसरखेड या तिन्ही गावात झालेल्या शौचालयाची तपासणी करण्यात यावी. शासनाने ठरवून दिलेले अनुदान लाभधारकांना मिळाले की नाही याची सुद्धा चौकशी करणे गरजेचे झाले आहे. ग्रामसभाही कागदावरच!इसरखेड ग्रामपंचायतीमध्ये २०१३ पासून नोटीस लावून व दवंडी देवून एकही ग्रामसभा झाली नाही. कोरमअभावी सभा रद्द दाखवून निर्णय घेण्यात आले. 

पैसे वाटपही रेकॉर्डलाच!शौचालय अनुदानाची रक्कम सुद्धा वाटप केल्याचे आॅ़नलाईन यादीत दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र संबधितांनी ही रक्कम मिळाली नसल्याचे वास्तव आहे. 

इथे झाले घोळइसरखेड, नवीन इसरखेड, पिंप्री कोळी येथील नागरिकांचे वैयक्तीक शौचालयाचे खोटे कागदपत्र तयार करून बील काढण्यात आले. खर्च झालेल्या बाबीची कोेणतीही शहानिशा गटविकास अधिकारी यांनी केली नाही. आॅनलाईन अहवालानुसार २०१४ मध्ये २४, २०१५ मध्ये ८ लाभधारकांना, २०१६ मध्ये २६ लाभधारकांना लाभ देण्यात आल्याची नोंद आहे. परंतू त्यांच्या पैकी ३४ नागरिकांकडे शौचालय नाही. तरीही अनुदान दिल्याची नोंद आहे. परंतू त्यांना रक्कम अदा करण्यात आली नाही. ही रक्कम कुणाच्या खिशात गेली याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

 

इसरखेडसह नवीन इसरखेड व पिंप्री कोळी येथील शौचालय घोेटाळ्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. - ए.टी.तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)  जि.प.बुलडाणा

 

शौचालय घोटाळ्याची चौकशी करण्यात अधिकाºयांकडून दिरंगाई केली जात आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला गटविकास अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली आहे. - गिताबाई नारायण कांडलकर (ग्रामपंचायत सदस्या, इसरखेड)

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूरा