आज निघणार सैलानीबाबाचा संदल

By Admin | Updated: March 11, 2015 02:00 IST2015-03-11T02:00:16+5:302015-03-11T02:00:16+5:30

सैलानी : उंटणीवरून मिरवणूक

Today will be the salon bacha chopal | आज निघणार सैलानीबाबाचा संदल

आज निघणार सैलानीबाबाचा संदल

पिंपळगाव सैलानी : मागील पाच दिवसांपासून सुरू झालेल्या सैलानीबाबांच्या मदारवर संदल चढणार आहे. पिंपळगाव सराई येथून बुधवारी रात्री सजविलेल्या उंटणीवरून भव्य मिरवणुकीद्वारे पारंपरिक पद्धतीने संदल निघतो.
होळी पंचमीला ६ मार्च रोजी नारळाची होळी पेटवून सुरू झालेली हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांच्या यात्रेचा समारोप उद्या निघणार्‍या संदलने होणार आहे. पिंपळगाव सराई येथून परंपरेनुसार मुजावर यांच्या घरून निघणार आहे. उकर कटोर्‍यामध्ये सैलानीबाबाचा संदल ठेवला जातो. तेथे पूजा करून ढोल-ताशाच्या गजरात सजविलेल्या उंटणीवरून संदलची मिरवणूक काढल्या जाते.
सैलानी दरगाहवर संदल पोहोचल्यानंतर शे.रफिक मुजावर, शे.हासन मुजावर, शे.नजीर मुजावर यांच्या हस्ते हा संदल बाबाच्या मजारवर चढविल्या जातो. संदलच्या दर्शनासाठी भाविकांची यावेळी तोबा गर्दी उसळते.

Web Title: Today will be the salon bacha chopal