टिप्पर लंपास करणा-याविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: October 1, 2014 00:51 IST2014-10-01T00:40:49+5:302014-10-01T00:51:52+5:30

टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारातून लंपास करणा-या चोरट्यास साखरखेर्डा पोलिसांनी पकडले.

Tippers Lapsing Offense | टिप्पर लंपास करणा-याविरुद्ध गुन्हा

टिप्पर लंपास करणा-याविरुद्ध गुन्हा

लोणार (बुलडाणा) : अवैध रेती वाहतूकीच्या प्रकरणत जप्त झालेला टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारातून लंपास करणार्‍या चोरट्यास साखरखेर्डा पोलिसांनी पकडले असून, त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाने अवैध रेतीवाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई मोहीम हाती घेतली होती. यामध्ये नायब तहसीलदारांनी अवैध रेती वाहतूक करणारे चार टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त केली होती. जप्त केलेल्या टिप्परपैकी एम.एच.२८ बी. ८७७0 क्रमांकाच्या टिप्परचालकाने तहसील कार्यालयास शनिवारची सुटी असल्याचे पाहून भाऊसाहेब भीमराव सुरडकर रा.बुलडाणा याने सदर टिप्पर लंपास केले. यासंदर्भात नायब तहसीलदार व्ही.एस. मते यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून, त्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान नाकाबंदी करुन सदर टिप्पर साखरखेर्डा येथे पकडून वाहनचालक भाऊसाहेब सुरडकर व वाहन मालक विवेक रवींद्र भालेराव रा.बुलडाणा यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Tippers Lapsing Offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.