टिप्परच्या धडकेत महिला ठार, ग्रामस्थांनी डंपरच जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 19:21 IST2019-07-19T18:55:46+5:302019-07-19T19:21:26+5:30
खामगाव : टिप्परच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना खामगाव ते जलंब रोडवर शुक्रवारी संध्याकाळी घडली.

टिप्परच्या धडकेत महिला ठार, ग्रामस्थांनी डंपरच जाळला
खामगाव : टिप्परच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना खामगाव ते जलंब रोडवर शुक्रवारी संध्याकाळी घडली. संतप्त नागरिकांनी टिप्पर ला आग लावली. ललिता सुपडा जाने (५२) असे महिलेचे नाव असून, ती जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगा बु. येथील रहिवासी असल्याचे समजते.
शुक्रवारी संध्याकाळी खामगाव कडे येणाऱ्या एका टिप्पर ने जलंब येथील महिलेला धडक दिली. यामध्ये सदर महिला जागीच ठार झाली. नागरिकांनी चालकास मारहाण करीत टिप्परला आग लावली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
टिप्परच्या धडकेत महिला ठार, नागरिकांनी गाडीलाच आग लावली pic.twitter.com/7VHIpo943p
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2019