टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: January 29, 2017 03:02 IST2017-01-29T03:02:40+5:302017-01-29T03:02:40+5:30

सुलतानपूर येथील घटना.

Tipper's death killed a biker | टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सुलतानपूर, दि. २८- सुलतानपूर येथील नदीवरील पुलाजवळ दुचाकी व टिप्परच्या झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, राजेगाव ता.सिंदखेडराजा येथील विष्णू अर्जुन भालेराव (वय ५0) हे मेहकरवरून सुलतानपूरकडे जात असताना त्यांच्या बजाज दुचाकी क्र.एम.एच.१४ ए.यू. ७८७४ ला सुलतानपूर येथील नदीजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या टिप्पर क्र.एम.एच.२८ ए.बी.७४८४ ची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार विष्णू भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. मृतास चार मुली व मुलगा असून, दोन उपवर मुली आहेत. घरातील कर्ता व्यक्ती अचानक गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर दुचाकीस्वारास चिरडून पसार झालेले रेती वाहतूक करणारे टिप्पर पाठलाग करून पीएसआय तानाजी गव्हाणे यांनी उकळी रोडवर पकडून टिप्परचालक सुनील चिंतामन शिरे यास घटनेच्या अर्धा तासाच्या आत अटक करून ताब्यात घेतले.

Web Title: Tipper's death killed a biker