टिप्परची कारला धडक; सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:07 IST2017-10-30T00:06:57+5:302017-10-30T00:07:42+5:30
खामगाव: टिप्परची कारला धडक लागून सहा जण जखमी झाल्याची घटना शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळ रविवारी घडली.

टिप्परची कारला धडक; सहा जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: टिप्परची कारला धडक लागून सहा जण जखमी झाल्याची घटना शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळ रविवारी घडली.
जळगाव खांदेश व नाशिक येथील भाविक कार क्रमांक एमएच १५ एफ एन 00२६ ने शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन खामगावकडे येत होते. त्यावेळी शेगावकडे जाणार्या टिप्पर क्रमांक एमएच ३२ बी ९0१६ ने कारला समोरून धडक दिली. यामध्ये टिप्पर प्रवासी निवार्याला धडकून उलटले. तसेच कारसुद्धा रस्त्याखाली जाऊन पडली. यामध्ये नाशिक येथील उज्ज्वला प्रशांत बारी (३२), द्वारका नीलेश बारी (३३), प्रशांत वासुदेव बारी (३३), हर्ष प्रशांत बारी (६), वैष्णवी नीलेश बारी (४), जळगाव येथील सुवर्णा नीलेश बारी (१५) हे जखमी झाले. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघा तात कारचे नुकसान झाले.