शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती - कुरूंदकर

By admin | Updated: March 5, 2015 23:40 IST

बुलडाणा जिल्हा आराखड्यात ६१.७१ कोटीची भरीव वाढ.

बुलडाणा : जिल्हा वार्षिक योजनेचा २0१४-१५ चा जिल्ह्याचा आराखडा यापूर्र्वी १६१ कोटी रुपयांचा होता. त्यामध्ये पालकमंत्नी एकनाथराव खडसे व जिल्हा प्रशासन यांच्या प्रयत्नाने तब्बल ६१.७१ कोटी रुपयांची एवढी भरीव वाढ करण्यात आली असून, आराखडा २२२.७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रांती झाली असून, त्याचे फलित म्हणून वाढीव निधीमध्ये ४१.७१ कोटी रुपये जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी ५ मार्च रोजी आयोजित पत्नकार परिषदेमध्ये दिली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी नेताम सेडाम व उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे उपस्थित होते. मुंबईत मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात येणार्‍या कामांचे सादरीकरण जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी केले होते. या कामांचे महत्त्व व जिल्ह्याची गरज लक्षात घेता आराखड्यात घसघसीत ६१.७१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ३३0 गावांची जलयुक्त शिवार अभियानात निवड करण्यात आल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, या ३३0 गावांमध्ये टँकरग्रस्त असणार्‍या ८0 गावांचा समावेश करण्यात आला आहे. समाविष्ट गावांचे पाणी ताळेबंद तयार करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारणांच्या कामांमुळे जिल्ह्यातील २७५ टँकरची असलेली मागणी ८ ते १0 पर्यंत आली आहे. गत काही दिवसांमध्ये जिल्ह्यात ४५0 च्या वर बंधारे बांधण्यात आली आहेत. खामगाव तालुक्यातील निरोड-घारोड भागामध्ये साखळी बंधारे घेतल्यामुळे तेथील भूजल पातळी वाढली असून, तेथील शेतकरी बागायती पिके घेत आहेत. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील धा. बढे, सिंदखेड लपाली या भागामध्येही शेतकरी केळीसारखे बागायती फळ पीक घ्यायला लागला आहे. हा क्रांतिकारी बदल जिल्ह्यामध्ये घडत असल्याचे त्यांनी सांगितले.