डाेंगरखंडाळा येथे तीन हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST2021-07-28T04:36:19+5:302021-07-28T04:36:19+5:30

बुलडाणा : तालुक्यातील ग्राम डोंगरखंडाळा परिसरात अवैधरीत्या विकल्या जाणारा तीन हजाराचा प्रतिबंधित गुटखा बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी २७ जुलै राेजी ...

Three thousand gutkas seized at Dangarkhandala | डाेंगरखंडाळा येथे तीन हजारांचा गुटखा जप्त

डाेंगरखंडाळा येथे तीन हजारांचा गुटखा जप्त

बुलडाणा : तालुक्यातील ग्राम डोंगरखंडाळा परिसरात अवैधरीत्या विकल्या जाणारा तीन हजाराचा प्रतिबंधित गुटखा बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी २७ जुलै राेजी जप्त केला आहे़

बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक मंगळवारी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, डोंगरखंडाळा येथे अवैधरीत्या गुटख्याची विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पथकाला डोंगरखंडाळा येथे साडेदहा वाजेच्या सुमारास आरोपी संजय श्रीराम चव्हाण रा. डोंगरखंडाळा हा गावात गुटखा विक्री करताना आढळून आला. त्याच्या जवळून एकूण तीन हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला. या प्रकरणी पोकॉ दुर्गासिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीट जमादार नारायण तायडे हे करीत आहे.

Web Title: Three thousand gutkas seized at Dangarkhandala