कवळे खून प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:04 IST2018-12-29T17:04:22+5:302018-12-29T17:04:47+5:30
धामणगाव बढे: मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील रामभाऊ कवळे यांच्या खून प्रकरणी तपासासाठी तीन पथके गठीत करण्यात आली आहे.

कवळे खून प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके
धामणगाव बढे: मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील रामभाऊ कवळे यांच्या खून प्रकरणी तपासासाठी तीन पथके गठीत करण्यात आली आहे. यामध्ये धामणगाव बढे पोलिस ठाण्याचे दोन तर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाचा समावेश आहे. मात्र अद्याप या खून प्रकरणाचे कुठेलेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यासंदर्भाने पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी काही साक्षीदारांचे बयानही नोंदवलेले आहेत. २६ डिसेंबर रोजी रामभाऊ कवळे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत लोणवडी शिवारात आढळून आला होता. प्रथम दर्शनी तो खून असल्याचे तपासात समोर येत होते. त्यासंदर्भाने मृतकाच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली होती. त्या आधारावर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान २८ डिसेंबरला उपरोक्त तीन पथके गठीत करण्यात येऊन या खूनाच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग देण्यात आला आहे. २६ डिसेंबरला रामभाऊ कवळे हे सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेले होते. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेहच हाती लागला होता. प्रकरणी त्यांची पत्नी मिना रामभाऊ कवळे यांनी २७ डिसेंबरला पोलिसात तक्रार दिली होती. मृतदेहावर मारहाणीच्या खूना व डोक्याला जखम आढळून आली होती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना खूनाचा संशय होता. त्या आधारावर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार संग्राम पाटील हे करीत आहेत.