भरधाव वाहनाच्या धडकेत बापलेकासह तीन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:04 IST2020-10-30T13:03:57+5:302020-10-30T13:04:07+5:30
Accident on Shegaon-khamgaon road बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ घडली.

भरधाव वाहनाच्या धडकेत बापलेकासह तीन जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ घडली.
माऊली कॉलेजजवळ एम.एच.२८-एएन ७२६५ ही दुचाकी उभी करून स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे (वय ३०) त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे (वय ५०) शेख रज्जाक शेख रहेमान (वय ४०) सर्व रा. सरकारी फैल शेगाव हे तिघे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी शेगावहून खामगावकडे जाणाऱ्या एम.एच.१५-बीएन ३३४९ या चारचाकी गाडीने त्यांना जबर धडक दिली.
यामध्ये स्वप्नील बावणे व मरिभान बावणे हे दोघे बापलेक जागीच ठार झाले. तर शेख रज्जाक शेख रहेमान गंभीर जखमी झाला. त्याला अकोला येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. शेगाव पोलिसांनी याप्रकरणी शेख रहीम शेख रहेमान रा. शेगाव यांच्या तक्रारीवरून चारचाकी वाहन चालक सुशिल सिध्दार्थ इंगळे (रा. सातेगांव, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूद्ध भादविंच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेव ठाकरे हे करित आहेत.