तीन रुग्णांची काेराेनावर मात, एक पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST2021-08-24T04:38:57+5:302021-08-24T04:38:57+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी केवळ एकाचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच तिघांनी काेराेनावर ...

Three patients overcame caries, one positive | तीन रुग्णांची काेराेनावर मात, एक पाॅझिटिव्ह

तीन रुग्णांची काेराेनावर मात, एक पाॅझिटिव्ह

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी केवळ एकाचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे़ तसेच तिघांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे़ तसेच ६६३ काेरेाना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़

पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथील एकाचा समावेश आहे़

त्याचप्रमाणे आजपर्यंत ६ लाख ७७ हजार ९१० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी ११५० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ३७२ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ६७३ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे २७ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Three patients overcame caries, one positive