बांधकाम व्यावसायीकाच्या घरी तीन लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:44 IST2018-07-13T12:42:55+5:302018-07-13T12:44:46+5:30

नांदुरा : शहरातील संकल्प कॉलनीतील बांधकाम व्यावसायीक नरेश मोहनलाल हरगुनानी (वय ३९) यांच्या घराची खिडकी उघडून टेबलावर ठेवलेली तिन लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली.

Three million rupees stolen from the builder's home | बांधकाम व्यावसायीकाच्या घरी तीन लाखाची चोरी

बांधकाम व्यावसायीकाच्या घरी तीन लाखाची चोरी

ठळक मुद्देही घटना १२ जुलैरोजीच्या रात्री १२ ते पहाटे ३.४५ वाजेदरम्यान घडली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.  गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी तीन लाख रुपये घरातील टेबलवर ठेवले. आणि तसेच झोपायला गेले.


नांदुरा : शहरातील संकल्प कॉलनीतील बांधकाम व्यावसायीक नरेश मोहनलाल हरगुनानी (वय ३९) यांच्या घराची खिडकी उघडून टेबलावर ठेवलेली तिन लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली. ही घटना १२ जुलैरोजीच्या रात्री १२ ते पहाटे ३.४५ वाजेदरम्यान घडली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 
नरेश हरगुनानी हे बांधकाम व्यावसायीक आहेत. या शिवाय त्यांचे कपडा दुकान सुद्धा आहे. गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी तीन लाख रुपये घरातील टेबलवर ठेवले. आणि तसेच झोपायला गेले. सकाळी उठून पाहताय तर रोकड गायब झालेली त्यांना दिसली. याप्रकरणी १३ जुलैरोजी सकाळी त्यांनी नांदुरा पोलिस स्टेशनला चोरीची तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूध्द ४५७/३८० भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल असुन ठाणेदार अरूणराव आगे यांचे मार्गदर्शनात पीएसआय भास्कर तायडे तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three million rupees stolen from the builder's home