विष्णुवाडीत तीन लाखांची चोरी

By Admin | Updated: August 4, 2016 01:06 IST2016-08-04T01:06:55+5:302016-08-04T01:06:55+5:30

अज्ञात चोरट्यांनी केला हात साफ.

Three lakhs of theft in Vishnuvad | विष्णुवाडीत तीन लाखांची चोरी

विष्णुवाडीत तीन लाखांची चोरी

बुलडाणा, दि. ३ : स्थानिक विष्णुवाडीत वन विभागातील सेवानवृत्त धनंजय काळकर यांचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. धनंजय कासळकर यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्यामुळे ते पत्नीसह ३0 जुलै रोजी पुण्याला गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील दागिन्यांवर हात साफकेला. त्यात सोन्याचा हार, निरंजनी आदी दागिन्यांचा समावेश आहे. काळकर यांचे पुतणे संदीप काळकर यांनी या घराकडे चक्कर मारला असता त्यांना चोरी झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी धनंजय काळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत एकूण ३ लाख २२ हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Three lakhs of theft in Vishnuvad