बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 20:21 IST2017-09-14T19:55:33+5:302017-09-14T20:21:05+5:30

गुरूवारी जिल्ह्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. तसेच वीज पडून शेगाव तालुक्यातील जानोरी शिवारात दोन महिला तर मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथे एक तरूण ठार झाला.  तसेच दोन महिला जखमी आहेत. 

Three killed in electricity in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून तीन ठार

बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून तीन ठार

ठळक मुद्देशेगाव तालुक्यात दोन महिला ठारमोताळा तालुक्यात तरूण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गुरूवारी जिल्ह्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. तसेच वीज पडून शेगाव तालुक्यातील जानोरी शिवारात दोन महिला तर मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथे एक तरूण ठार झाला.  तसेच दोन महिला जखमी आहेत. 
शेगाव तालुक्यातील जानोरी शिवारात शेतात कामाला गेलेल्या मिरा ढोले (वय २१), रेखा लक्ष्मण वानखडे (वय ३७) या दोघींचा मृत्यू झाला तर रंजना डांगे, कमल निंभोळकार जखमी झाल्या आहेत. तसेच रिधोरा खंडोबा येथे  १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्यादरम्यान वीज पडून युवक ठार झाला. रिधोरा खंडोबा येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय तरुण विशाल भागवत कानडजे शेतात गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. गुरे चारत असतानाच वीज पडल्यााने त्याचा मृत्यू झाला. रिधोरा गावकºयांना घटनेची माहिती मिळताच ताबडतोब धा.बढे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

Web Title: Three killed in electricity in Buldhana district