शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

पांदण रस्त्यांसाठी तीन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 3:17 PM

जिल्ह्यात १९१ किमीचे पांदण रस्ते बांधण्याचे उद्दीष्ट असून त्याची संख्या १८२ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्यास पांदण रस्ते निर्मितीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तालुकास्तरावर १ कोटी ७५ लाख ५० हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता व परतीच्या पावसामुळे पांदण रस्ते निर्मितीत निर्माण झालेले अडथळे आता दूर झाले असून कामे मार्गी लागली आहेत. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत ही कामे सुरू आहेत.जिल्ह्यात १९१ किमीचे पांदण रस्ते बांधण्याचे उद्दीष्ट असून त्याची संख्या १८२ आहे. याबाबतचे कार्यारंभ आदेश पूर्वीच देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १२१ किमी लांबीची ७२ कामे सुरू आहेत. यापैकी ५२ किमी लांबीच्या ३७ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर २५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये बुलडाणा ६ लाख, चिखली १, मेहकर ०, लोणार ०, देऊळगावराजा ४ लाख २३ हजार, सिंदखेडराजा २ लाख ४४ हजार, मलकापूर ०, मोताळा ५ लाख ५४ हजार, नांदुरा ०, खामगाव ०, शेगाव ४.२५, संग्रामपूर ० तर जळगाव जामोद तालुक्यासाठी १ लाख २ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तर ९१ किमी लांबीच्या ५४ पांदण रस्त्यांचे काम सुरू आहे. त्याला ५९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत तालुकास्तरावर १ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यापैकी रस्त्याच्या कामावर २२ लाखांचा खर्च झाला आहे. वर्तमानस्थितीत १ कोटी ५३ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान शिल्लक आहे. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचे काम रखडले होते. आता बांधकामातील सर्व अडथळे दूर झाले असून कामे मार्गी लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील बहुतांशी भागातील पांदण रस्त्यांचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे सुलभ होणार आहे. उर्वरीत कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावरील प्रशासनास सूचना दिल्या आहेत.बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक कामबुलडाणा तालुक्यातील २७ किमी लांबीच्या १३ कामांसाठी १३ लाख ५० हजारांच्या निधीचा कार्यारंभ आदेश निघाला होता. आतापर्यंत १३ किमी लांबीच्या ६ रस्त्यांचे काम पूर्णत्वास गेले असून यावर ६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बुलडाणा तालुक्यातील सर्वाधिक रस्ते पूर्णत्वास गेले आहेत. इतर तालुक्यांमध्ये परतीच्या पावसामुळे काम रखडले होते. आता अडथळे दूर झाल्याने ही सर्व कामे सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा