स्मारकांचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-26T23:38:46+5:302014-06-27T00:27:33+5:30
लोणार : पुरातन विभागाचे दुर्लक्ष.

स्मारकांचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात
मयुर गोलेच्छा / लोणार
पुरातन सर्वेक्षण विभागाचे राष्ट्रीय संरक्षीत स्मारके असलेल्या लोणार शहरातील पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील पुरातन स्मारके घाणीच्या विळख्यात आहेत. त्यामुळे स्मारकांचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात आले आहे.
येथे पुरातन विभागाचे ३६ लहानमोठे राष्ट्रीय संरक्षीत स्मारके असल्यामुळे याठिकाणी पुरातन विभागाच्या उपविभागीय कार्यालयाची स्थापना झालेली आहे. शहरातील पुरातन स्मारकांना प्राचीन वैभव असून, ही संरक्षीत स्मारक सुंदर, नक्षीकाम झालेली असून, सर्व मंदिरेही अजिंठा, वेरुळप्रमाणे हेमाडपंथी आहेत. ये थील हेमाडपंथी मंदिराचे जतन व संवर्धव व्हावे या उद्देशाने केंद्रशासनाने भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला असून सुद्धा मंदिराची दुरावस्थाच आहे. मंदिराच्या अवशेषाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. लोणार सरोवर व शहरातील पर्यटन स्थळांना विकसीत करण्यासाठी शहरात कॅनडा येथील तज्ञ अभियंते दाखल झाले असून, त्यांनी या मंदिराच्या दुरावस् थेविषयी खंत व्यक्त केली. शहरातील अद्भुत कलाकृतीचा नमुना असलेल्या दै त्यसुदन मंदिर, अहिल्याबाई होळकर अन्नछत्र, प्राचीन लिंबी बारव, धारातिर्थ, पाप हरेश्वर मंदिर याठिकाणी सुद्धा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी चौकदार नसल्यामुळे त्याठिकाणी गुटखा पुड्या, प्लास्टीकच्या पिशव्या याचाही स्तर साचत आहे. धारातिर्थ परिसरात आंघोळ करतांना साबन, शॉम्पु आदी वस्तु वापरण्यास तसेच कपडे धुण्यास प्रतिबंध असल्याचे फलक लावण्यात आले असून सुद्धा नियमांचे उल्लंघन केल्या जात आहे. धारातिर्थ परिसरात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावे, अशी अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. परंतु याकडे दुर्लक्षच होत आहे. जागतीक किर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या पुरातन वास्तुकडे विभागाचे कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास पुरातन वास्तुचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त होवून पर्यटन नगरीचे वैभव लोप पावल्याशिवाय राहणार नाही.