तरुणीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:18 IST2017-10-04T01:18:21+5:302017-10-04T01:18:56+5:30

मोताळा: तालुक्यातील वरुड येथील १६ वर्षीय तरुणीचा  विनयभंग करून  जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना  मंगळवारी उघडकीस आली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली आहे. 

The threat of killing the woman by molestation | तरुणीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी 

तरुणीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी 

ठळक मुद्दे१६ वर्षीय तरुणी मोताळा तालुक्यातील वरुड येथील रहिवासीदोघांविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: तालुक्यातील वरुड येथील १६ वर्षीय तरुणीचा  विनयभंग करून  जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना  मंगळवारी उघडकीस आली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली आहे. 
१६ वर्षीय पीडित तरुणीने बोराखडी पोलीस स्टेशनला दिलेल्या  फिर्यादीमध्ये नमूद आहे की, २ ऑक्टोबर रोजी घटनेतील पीडित  तरुणी आपल्या घरासमोरील अंगणात बसलेली असताना आरो पी भागवत आत्माराम गरूडे तिथे आला व पीडित तरुणीस त्रास  दिला. त्यानंतर फिर्यादीने त्याला चापट मारली असता तो निघून  गेला व  शांताराम देवीदास जुनारे याने शिवीगाळ करून जिवे  मारण्याची धमकी दिली. ३ ऑक्टोबर रोजी  फिर्यादीने दिलेल्या  फिर्यादवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी भागवत आत्माराम  गरुडे (वय २२), शांताराम देवीदास जुनारे (वय ३८) राहणार  वरुड यांच्या विरुद्ध कलम ३५४ अ, ५0४, ५0६, ३४,  भादंविसह कलम १२ फासकोनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल  केला असून, आरोपींना अटक करण्यात आले आहे. 

Web Title: The threat of killing the woman by molestation