हजारो शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:43 IST2019-12-28T15:42:53+5:302019-12-28T15:43:08+5:30
शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी लागणारा अवधी पाहता, हजारो शेतकºयांना आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत

हजारो शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा!
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून दुष्काळी अनुदान जाहीर झाले. या प्रक्रीयेला १ महिना उलटला असला, तरी खामगावसह घाटाखालील हजारो शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम अति पावसामुळे धोक्यात आला. उडीद, मुग, सोयाबीन, ज्वारी, मका, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शासन स्तरावरून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती राजवट सुरू असतानाच्या काळात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानापोटी राज्यपालांनी मदतीची घोषणा केली. यानुसार दोन हेक्टरपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या मदतीनुसार हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर करण्यात आली. फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपये मदत देण्याची घोषणा झाली. यानंतरही बराच कालावधी गेला. अखेर नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम तालुका स्तरावर जमा करण्यात आली. त्याचे वाटपही काही ठिकाणी पुर्ण झाले, तर अद्यापही काही शेतकºयांना मदत मिळणे बाकी आहे. यानंतर दुसºया टप्प्याची रक्कम जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही रक्कम बँकनिहाय वाटप करण्यासाठी आणखी आठवडा जाईल. गत पहिल्या टप्प्यातील मदत जमा होण्याकरीता लागलेला महिनाभराचा कालावधी लक्षात घेता, दुसºया टप्प्यातील मदत शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात जमा होईपर्यंत आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसºया टप्याची रक्कम आणि नंतर वाटप यामुळे अगदी शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी लागणारा अवधी पाहता, हजारो शेतकºयांना आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत. वास्तविक पाहता, खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान तसेच गत तीन ते चार वर्षांपासून असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता, यावर्षी शेतकºयांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता होती. एकीकडे यावर्षीच्या दुष्काळी अनुदानाची ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे गतवर्षीचे दुष्काळी अनुदान, पिक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेही भीजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकºयापर्यंत लाभ केव्हा मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.