शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

"त्या" पीडितेला सहा लाखांची मदत

By admin | Updated: June 11, 2017 02:28 IST

बुलडाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथील प्रकरण: गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे राजकुमार बडोले यांचे आश्‍वासन.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रूईखेड मायंबा येथील पीडितेला एक लाख रूपयांची मदत दिली असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याचे आश्‍वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात दिले. रूईखेड मायंबा येथील एका महिलेला गावातीलच काही नागरिकांनी मारहाण करून धिंड काढली होती. याप्रकरणी चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलन करीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पीडित महिलेची शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट घेतली. यावेळी पीडितेने तिला झालेल्या मारहाणीची माहिती दिली. गावातीलच काही नागरिकांनी मारहाण केली असून, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे सदर पीडितेने सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना सांगितले. सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी सदर महिलेला मुख्यमंत्र्यांच्या निधीतून पाच लाख रूपयांची मदत घोषीत केली. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थूल, जि. प अध्यक्ष उमा तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, तहसीलदार सुरेश बगळे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक वडपुते, प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते.सी.एल थूल यांची रूईखेड मायंबा येथे भेट महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी .एल थूल यांनी १0 जून रोजी रूईखेड मायंबा येथे पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेत कुटूंबीयांशी चर्चा केली. अँट्रासिटी कायद्यातंर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.