शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी एकही तासिका झालीच नाही!

By admin | Updated: February 23, 2015 00:27 IST

परीक्षेसाठी उरला एक महिन्याचा कालावधी; शिक्षण विभाग कुंभकर्णी झोपेत.

फहीम देशमुख /शेगाव (बुलडाणा): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणार्‍या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी जिल्ह्याभरातील बहुतांश शाळांमध्ये अतिरिक्त तासिका झाल्याच नसल्याचा ध क्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेसाठी फक्त एक महिना कालावधी उरला असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणार्‍या पूर्व माध्यमिक इयत्ता चवथीच्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ५ वी ते ७ वी व माध्यमिक स्तरावर इयत्ता ७ वीच्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ८ वी ते १0 वी पर्यंत गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमधे तीन महिन्यांपूर्वी इयत्ता ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांकडून फी भरून घेऊन अर्ज दाखल करून घेण्यात आले. या परीक्षा बुलडाणा जिल्ह्यात येत्या २२ मार्च रविवार रोजी विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे; मात्र जी परीक्षा होणार आहे त्याबाबत जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधे तासिका झाल्या नाहीत. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त सकाळी ९.३0 ते १0.३0 आणि ५.३0 ते ६.३0 या वेळेमध्ये या परीक्षेबाबत शिकविले जाणे आवश्यक आहे; मात्र याबाबत लोकमतने अनेक शाळांमध्ये भेटी दिल्या असता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करून घेतली नसल्याचे दिसून आले. अनेक शाळांमध्ये फी भरली, अर्ज दिले; परंतु परीक्षा केव्हा आहे, याची माहितीही विद्यार्थ्यांना नाही. नियमानुसार या परीक्षेसाठी अतिरिक्त तासिका घेऊन शिकविणे आणि तसे शिकविल्याची नोंदवही तयार ठेवणे आवश्यक आहे. यावरून शिक्षण विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने आता २२ मार्च रोजी होणार्‍या परीक्षेत विद्यार्थी काय लिहितील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे.