शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सिंचनासाठी पाण्याचे यंदा आरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:58 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बुलडाणा: दुष्काळी स्थिती पाहता यावर्षी कृषी सिंचनासाठी पाणी न देण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले असून, प्रकल्पांमधील ३४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, आगामी काळातील टंचाईची तीव्रता पाहता प्रसंगी अकोला, वाशिम व जळगाव खान्देश जिल्ह्यातून उपलब्धतेनुसार टँकरद्वारे पाणी आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन चाचपणी करीत आहे.दुसरीकडे कंडारी, विद्रुपा, व्याघ्रा, केशव शिवणी, धामणगाव देशमुख, शिवणी आरमाळ येथील प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता पाहत ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणाहून संबंधित गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपरोक्त प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने संबंधित गावातील पाणी आरक्षणाचाही पेच निर्माण झालेला आहे. नांदुरा, सिंदखेड राजा, मोताळा तालुक्यातील हे प्रकल्प असून, पाणी उपलब्ध नसल्याने येथील पाणी आरक्षण मंजूर करता आलेले नाही.ज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसी आणि अकोला जिल्ह्यातील दोन गावांसाठी नदीपात्र तथा कॅनॉलद्वारे सोडण्यात येणारे पाणी यंदा मात्र अभूतपूर्व टंचाईची शक्यता पाहता सोडण्यात येणार नसल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती