मलकापूर ग्रामीण भागात दारिद्रय़ रेषेचा सर्व्हेच नाही
By Admin | Updated: August 13, 2014 00:09 IST2014-08-13T00:09:35+5:302014-08-13T00:09:35+5:30
मलकापूर ग्रामीण या ग्रामपंचायत परिसरात गेल्या १२ वर्षापासून दारिद्रय रेषेखालील लोकांचा सर्व्हेच झाला नाही.

मलकापूर ग्रामीण भागात दारिद्रय़ रेषेचा सर्व्हेच नाही
मलकापूर : नियमानुसार दर ५ वर्षांनी दारिद्र्य रेषेचा सर्वे व्हावा, असे असताना मलकापूर ग्रामीण या ग्रामपंचायत परिसरात गेल्या १२ वर्षापासून दारिद्रय रेषेखालील लोकांचा सर्व्हेच झाला नाही. परिणामी शेकडो नागरीक शासनाच्या विविध योजनापासून वंचीत राहत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य केदार एकडे यांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे सादर तक्रारीत एकडे यांनी नमूद केले की, मलकापूर ग्रामीण या ग्रामपंचायत परिसरात दारिद्रय रेषेखालील लोकांचा सर्व्हे हा सन २00१-२00२ या साली झाला होता. त्यावेळी अत्यंत चुकीच्या पध्दतीचा सर्व्हे झाल्याने अनेकांचा लाभार्थी असूनही समावेश झाला नाही. तब्बल १२ वर्षे झाली असूनही मलकापूर ग्रामीण या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील परिसरात दारिद्रय रेषेखालील लोकांचा सर्वे झाला नाही. त्यामुळे अनेक ग्रामस्थ शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहेत. तरी याप्रकरणी शासनाने वैयक्तिक लक्ष केंद्रीत करावे जेणेकरून शासनाच्याच विविध योजनापासून वंचीत शेकडो नागरीकांना न्याय मिळेल, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य केदार एकडे यांनी केली आहे.