शेगावात दोन गटांत वाद
By Admin | Updated: April 4, 2017 00:53 IST2017-04-04T00:53:34+5:302017-04-04T00:53:34+5:30
परिस्थिती नियंत्रणात

शेगावात दोन गटांत वाद
शेगाव : सफाई कामगार महिलेस हटकल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना शहरात सोमवारी सायंकाळी घडली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
फरशीपुरा भागात काही सफाई कामगार महिला काम करत असताना एमआयएमचे नगरसेवक मो. वसीम पटेल यांनी त्यांना सफाईच्या कामाबद्दल हटकले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. सायंकाळी या महिलांनी आपल्या परिसरातील नागरिकांना या वादाची माहिती दिली. नगरसेवक पटेल यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलांनी केला. त्यामुळे संतप्त जमाव सायंकाळी ७.३०च्या सुमारास नगर परिषदेवर धडकला. नगरसेवक पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जमावाने केली. नंतर लाठ्या-काठ्या घेऊन २५ ते ३० जणांनी नगरसेवक पटेल यांचे घर गाठले. यावेळी दोन गटांत बाचाबाची झाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करणे सुरू होते. (शहर प्रतिनिधी)