नांदुरा तहसीलमध्ये ११ पदे रिक्त
By Admin | Updated: June 2, 2014 00:01 IST2014-06-02T00:00:25+5:302014-06-02T00:01:10+5:30
नांदुरा तहसील कार्यालयात अकरा पदे रिक्त झाल्यामुळे असलेल्या कर्मचार्यावर कामाचा ताण वाढत आहे.

नांदुरा तहसीलमध्ये ११ पदे रिक्त
नांदुरा : नांदुरा तहसील कार्यालयात अकरा पदे रिक्त झाल्यामुळे असलेल्या कर्मचार्यावर कामाचा ताण वाढत आहे. परिणामी नागरीकांचे कामे खोळंबून राहत आहेत व नागरीक यामुळे त्रस्त झालेले आहेत. उत्पन्नाचा दाखला असो की, जातीय दाखला, संजय निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा जन्म तारखेच्या नोंदीची माहिती घेणे असो अशा एक नाही अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी तहसील कार्यालयामार्फत केल्या जाते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अगदी तालुक्याच्या टोकावर राहणारा गाव खेड्यातील माणूस शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तिचा लाभ मिळविण्यासाठी तहसिल कार्यालयात येतो. मात्र तहसील कार्यालयात मंजुर पदापैकी जवळपास अकरा पदे रिक्त असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. नांदुरा तहसीलमध्ये नायब तहसीलदाराची चार पदे असून यामध्ये एक रिक्त आहे. अव्वल कारकुनची मंजुर आठ पदे असून तिन रिक्त आहेत, लिपिक टंकलेखकची मंजुर पंधरा पदे असून सहा रिक्त आहेत. जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.