पोलिस ठाण्यासमोरील सात दुकानांवर चोरट्यांनी केला हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:31 IST2020-10-10T12:30:40+5:302020-10-10T12:31:14+5:30

एकाच रात्री सात दुकाने फुटल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Theft in seven shops in front of the Dhad police station | पोलिस ठाण्यासमोरील सात दुकानांवर चोरट्यांनी केला हात साफ

पोलिस ठाण्यासमोरील सात दुकानांवर चोरट्यांनी केला हात साफ

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : मढ येथील घरफोडीच्या घटनेनंतर थेट धाड पोलिस ठाण्याच्या समोरीलच सात दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. पोलिस ठाण्यापासून अवघ्या ६० फुट अंतरावरीलही दुकाने आहेत. नऊ आॅक्टोबरच्या पहाटेदरम्यान ही चोरीची घटना घडली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
धाड पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या मढ येथे १ आॅक्टोबरला मध्यरात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. त्याच्या आठ दिवसानंतर थेट धाडमध्येच सहा दुकानात चोरी केली. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चिरानीयी ट्रेडर्सच्या छताचे टीनपत्रे वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश करत गल्ल्यातील हजारो रुपयांच रोकड लंपास केली. त्यानंतर स्वीटमार्ट फोडून त्यातील सुमारे १५ हजार रुपये, इलेक्ट्रीकल दुकानातील १५ हजार रुपये किंमतीचे वायरचे बंडल, अ‍ॅग्रो ट्रेर्स, वर्षा इलेक्ट्रीक, रॉयल इलेक्ट्रीक व शेतकरी ट्रेडर्समध्येही अज्ञातांनी चोरी केली असून या दुकानांमधीलही सरासरी दीड हजार रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री सात दुकाने फुटल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.  


नग्न चोरटा सीसीटिव्हीत कैद
नग्नावस्थेतील चोरट्याने एका दुकानाचे टीनपत्रे वाकून आत प्रवेश केला व गल्ल्यात असलेली रक्कम घेवून पलायन केले असे छायाचित्रन सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहे. त्यामुळे या चोरट्याचा शोध घेण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे. गेल्या काही वर्षात धाडमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिस ठाण्यांच्या लगतच्या भागातच बहुतांश चोºया झाल्याचे पाहता खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Theft in seven shops in front of the Dhad police station