लांजुड लघुप्रकल्पातूनही गौण खनिजाची चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:22 IST2019-07-08T16:21:47+5:302019-07-08T16:22:31+5:30
लांजूड येथील लघू प्रकल्पाच्या सांडव्यातील हजारो ब्रास गौण खनिज चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

लांजुड लघुप्रकल्पातूनही गौण खनिजाची चोरी!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव तालुक्यातील गौण खनिज चोरी रोखण्यात महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. बोरजवळा येथील तलावानंतर आता लांजूड येथील लघू प्रकल्पाच्या सांडव्यातील हजारो ब्रास गौण खनिज चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खामगाव महसूल विभागाच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली.
खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून सुमारे साडेचार हजार गौण खनिजाची चोरी झाल्याचा प्रकार जून महिन्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आला. बोरजवळा येथील गौण खनिज चोरीच्या वृत्ताची शाई वाळते ना वाळते तोच, पुन्हा तालुक्यातील लांजूड लघू प्रकल्पातून हजारो ब्रास खरप (कच्चा मुरूम) आणि मुरूमाची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला. खामगाव महामार्ग आणि जळगाव जामोद रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीकडून ४ जुलैच्या रात्री हे खोदकाम करण्यात आले. खोदकामासाठी तीन पोकलेन आणि १५ टिप्परच्या साहाय्याने ही चोरी करण्यात आली. चोरी सुरू असतानाच महसूलच्या वरिष्ठांसह इतर अधिकाºयांना माहिती देण्यात आली. मात्र, महसूल अधिकाºयांकडून कोणतीही दखल न घेण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.
स्थळ निरिक्षण आणि पंचनाम्यास विलंब!
शेतसर्वे क्रमांक १५४ अ आणि १४८ ला लागून असलेल्या परिसरातून रात्रीच्या अंधारात हजारो गौण खनिजाची चोरी सुरू होती. त्यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पटवारी यांना माहिती देण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तसेच स्थळ निरिक्षण अािण पंचनामा करण्यास जाणिवपूर्वक विलंब केल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल कण्यात आलेल्या तक्रारीत तक्रारकर्ते लक्ष्मण सनानसे यांनी नमूद केले आहे.
लक्षावधी रुपयांच्या रॉयल्टीला चूना!
खामगाव तालुक्यातील बोरजवळा आणि पारखेड येथील प्रकल्पातून चोरी गेलेल्या हजारो ब्रास गौण खनिजापोटी स्वामित्व धन (रॉयल्टी) बुडाली . त्यामुळे महसूल प्रशासनाला लक्षावधी रुपयांचा चूना लागला असला तरी, महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचे यामुळे चांगभले होत असल्याची चर्चा आहे.
लांजूड लघु प्रकल्पातील सांडव्यातून ४ जुलैच्या रात्री गौण खनिजाची चोरी झाली. ही वस्तुस्थिती आहे. याप्रकरणी स्थळ निरिक्षण करून पंचनामा तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे.
- श्रीकृष्ण गोतरकर
मंडळ अधिकारी, पारखेड ता. खामगाव.