मांडवा येथे चोरी; १ लाख ८३ हजारांचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:02 IST2021-03-13T05:02:46+5:302021-03-13T05:02:46+5:30

प्रल्हाद आबाराव दराडे यांनी गुरुवारी बीबी पोस्टेला तक्रार दिली आहे. मलकापूर पांगरा रोडला लागून असलेल्या प्रल्हाद दराडे यांच्या घरामध्ये ...

Theft at Mandwa; 1 lakh 83 thousand worth of goods | मांडवा येथे चोरी; १ लाख ८३ हजारांचा माल लंपास

मांडवा येथे चोरी; १ लाख ८३ हजारांचा माल लंपास

प्रल्हाद आबाराव दराडे यांनी गुरुवारी बीबी पोस्टेला तक्रार दिली आहे. मलकापूर पांगरा रोडला लागून असलेल्या प्रल्हाद दराडे यांच्या घरामध्ये १० मार्च रोजीच्या रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा कडीकोंयडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने किमती अंदाजे एक लाख ८३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पोलीस ठाणे बीबी येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पी.एस.आय व्यवहारे, विजय पवार, पंडित नागरे हे करीत आहेत. त्यादरम्यान श्वानपथक व फिंगरप्रिंट यांना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक व फिंगरप्रिंट यांच्या चमूने घटनास्थळी येऊन शोधमोहीम राबविली. घटनास्थळावर एल. डी. तावरे, बीबी पो.स्टे.चे ठाणेदार व पोलीस उपविभागीय अधिकारी यामावार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: Theft at Mandwa; 1 lakh 83 thousand worth of goods