शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच!

By अनिल गवई | Updated: October 4, 2022 19:49 IST

शासकीय गोदामातील हमालांच्या नशीबी तीन-तीन महिने मजुरीची प्रतीक्षा कायम

अनिल गवई, खामगाव: जिल्हा पुरवठा विभागाकडून देयक मिळाल्यानंतरच शासकीय गोदामातील हमालांची मजुरी अदा केली जात आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शासकीय गोदामातील हमालांना मजुरीसाठी तब्बल तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे.

जिल्ह्यातील शासकीय गोदामात नोंदणीकृत हमाल पुरविणाºया संस्थेकडून प्रत्येक महिन्याच्या ०५ तारखेपर्यंत ऑनलाइन पध्दतीने अथवा धनादेशाद्वारे मजुरी माथाडी मंडळात  तर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नोंदीत हमाल कामगारांची जिल्हा माथाडी मंडळाने घोषित केलेली लेव्हीची रक्कम १५ तारखेपर्यंत माथाडी मंडळात जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर कंत्राटदार संस्थेने मजुरीच्या रक्कम माथाडी मंडळात जमा केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा पुरवठा विभागात सादर केल्यानंतर संबंधित रक्कमेची अदायगी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करणे अपेक्षित आहे. तसा लिखित करारच आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने देयकाची रक्कम अदा केल्यानंतरच साई मल्हार हमाल व मापाडी कामगार सहकारी संस्था मर्या. नाशिक या संस्थेकडून केली जात आहे. त्यामुळे हमालांना मजुरीच्या रक्कमेसाठी  तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर येत आहे.

एप्रिल-मे-जूनची मजुरी सप्टेंबरमध्ये!

जिल्ह्यात जिल्हा पुरवठा विभागाकडून देयक मिळाल्यानंतरच मजुरीची अदायगी केली जात आहे. त्यामुळे हमालांना मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागतेय. जिल्ह्यातील सर्वच हमालांना एप्रिल-मे-जूनची मजुरी सप्टेंबर महिन्यात अदा केली गेली. तर आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची प्रतीक्षा कायम आहे.

बुलडाणा जिल्ह्यात १६ शासकीय गोदाम

जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यात प्रत्येक एक शासकीय गोदाम आहे. त्याचवेळी साखरखेर्डा, अमडापूर आणि डोणगाव येथे प्रत्येकी एक प्रमाणे ०३ गोदाम आहेत. जिल्ह्यातील सर्वच १६ गोदामात १८० पेक्षा अधिक हमाल कार्यरत आहेत. त्यांना आवक २०- जावक १५ असे एकुण एका क्विंटलसाठी ३५ रुपये मजुरी अदा केली जाते.

"हमालांच्या मजुरीचे देयक गोदाम स्तरावरून तहसील कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर तहसील स्तरावरून जिल्हा पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी जाते. वरिष्ठ स्तरावरूनच हमालांच्या मजुरीचा प्रश्न मार्गी लागतो. सद्यस्थितीत खामगाव येथील गोदामातील कामकाज सुरळीत आहे", असे अमोल बाहेकर (गोदाम व्यवस्थापक, शासकीय गोदाम, खामगाव) यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा