शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; संपत्तीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!

By सदानंद सिरसाट | Updated: July 22, 2024 15:53 IST

आरोपीसह त्याच्या मित्राला अटक.

(सदानंद सिरसाट : खामगाव, जि. बुलढाणा)संग्रामपूर-वरवट बकाल : वान नदीपात्रात पाच दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले आहे. संपत्तीचा हिस्सा नावावर करून देत नसल्याच्या वादातून मुलाने त्याच्या मित्रासह वडिलांची हत्या केल्याचे उघड झाल्याने जामोद येथील रहिवासी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर, मृत अशोक विष्णू मिसाळ (५०) असून, अकोला जिल्ह्यातील, तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील रहिवासी आहे.

संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावालगत दक्षिण दिशेला वाननदी पात्रातील एका खड्ड्यात अनोळखी मृतदेह १६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आढळून आला होता. तामगाव पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून पाचव्या दिवशी रविवारी या प्रकरणाचे रहस्य उलगडले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृत अशोक मिसाळ १३ जुलै रोजी दानापूर येथे घरात झोपेत असताना, रात्री मुलगा व त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दानापूर येथून दुचाकीने वान नदी पात्रातील एका खड्ड्यात रेती मिश्रीत दगडांनी बुजवून ठेवला. तिसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तपास करीत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा तामगाव पोलिस ठाण्यात कलम १०३ (१), २३८ भा. न्या. संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, विलास बोपटे, बिट जमादार अशोक वावगे, रामकिसन माळी, प्रमोद मुळे, विकास गव्हाड, संतोष मेहेंगे, संतोष आखरे यांनी केली.संपत्तीच्या हिश्शासाठी घडले हत्याकांडवडिलांकडे संपत्तीचा हिस्सा नावावर करून देण्याची मागणी नेहमी आरोपी मुलाकडून होत होती. मात्र, मृतकाने संपत्ती नावावर करून दिली नसल्याच्या कारणावरून मुलाने हा प्रकार केला. याप्रकरणी जामोद येथील आरोपी मुलगा प्रमोद उर्फ शुभम अशोक मिसाळ (२४), त्याचा मित्र राहुल रामदास दाते (२५) या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुलगा आल्यानंतर वडील गायबशनिवारी दुपारी आरोपी प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ हा वडिलांच्या भेटीसाठी आला होता. रात्रभर अशोक मिसाळ यांच्यासोबत होता. दुसऱ्या दिवशी कोणालाही काही न सांगता परस्पर जामोद येथे निघून गेला, तेव्हापासूनच अशोक मिसाळ हेसुद्धा गायब झाल्याची माहिती पुढे आली.

२० वर्षांपासून होते वेगळेअशोक मिसाळ हे त्यांची पत्नी व मुलापासून गेल्या २० वर्षांपासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांच्या नावावर असलेली जमीन व प्लॉट हे त्यांची पत्नी व मुलाच्या नावावर करून देत नव्हते, तसेच त्याची परस्पर विक्री करीत होते. याबाबत मुलगा प्रवीण हा दानापूर गाठून वडिलांशी वाद घालत होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी