कृतज्ञता रॅलीद्वारे बाबासाहेबांना वंदन!

By Admin | Updated: December 7, 2015 02:20 IST2015-12-07T02:20:47+5:302015-12-07T02:20:47+5:30

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतज्ञता रॅली

Thanksgiving Rally to Babasaheb! | कृतज्ञता रॅलीद्वारे बाबासाहेबांना वंदन!

कृतज्ञता रॅलीद्वारे बाबासाहेबांना वंदन!

बुलडाणा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ६ डिसेंबर रोजी कृतज्ञता रॅली काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त न्याय, समता आणि बंधुता अखंडित राहण्यासाठी या अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी जिल्हाध्यक्ष अँड. साहेबराव सरदार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अँड. सुमीत सरदार, नरेश शेळके, दत्ता काकस, लहाने, सावजी जाधव, संदीप पाटील, आप्पाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. कृतज्ञता अभिवादन रॅलीला महिलांचा उ त्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या रॅलीत युवतीमध्ये प्रामुख्याने अश्‍विनी कांडेलकर, आशा गवई, दीपिका जंजाळ, रेखा कवडे, उज्ज्वला अकारे, स्वाती चव्हाण, दीपाली सावळे, पुष्पा शेजूळ, मनीषा बावरे, अर्चना सरदार, स्वाती साबळे, माया खंडेराव, स्वामी पाटोळे, विद्या घेवंदे, ङ्म्रद्धा मोरे, जमुना शिंदे, राधा डावर, सविता लठाड या युवतींची विशेष उपस्थिती दिसून आली.

Web Title: Thanksgiving Rally to Babasaheb!