समृद्धीवर ट्रकचा भीषण अपघात, चालक जागीच ठार
By संदीप वानखेडे | Updated: February 24, 2024 17:34 IST2024-02-24T17:33:03+5:302024-02-24T17:34:39+5:30
मेहकर : चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून भरधाव ट्रक बॅरिकेड्सवर धडकला़ अपघातानंतर रस्त्याच्या बाजुला उलटलेल्या ट्रकने पेट घेतला. यामध्ये ...

समृद्धीवर ट्रकचा भीषण अपघात, चालक जागीच ठार
मेहकर : चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून भरधाव ट्रक बॅरिकेड्सवर धडकला़ अपघातानंतर रस्त्याच्या बाजुला उलटलेल्या ट्रकने पेट घेतला. यामध्ये चालकाचा हाेरपळून मृत्यू झाला तर क्लिनरसह अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापूर नजीक २४ फेब्रुवारीच्या पहाटे घडली. एजाज शहा असे मृतक चालकाचे नाव आहे.
ट्रकचालक एजाज शहा (वय २२) ,वाहक सोहिल अली (वय १८) ,शकील शाहा (वय ३२) हे ट्रक क्रमांक एम एच ०४-जे.यू.६६२६ ने नागपूरहून मुंबईला जात हाेते़ दरम्यान, फर्दापूर नजीक समृध्दी महामार्गावर ट्रक चालकाला डुलकी लागली आणि ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक बॅरिकेड्सला धडकला व उलटला़ त्यानंतर क्षणार्धात ट्रकने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले त्यामध्ये ट्रकचालक एजाज शहा याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर वाहक सोहिल अली व शकिल शाहा राहणार सर्व उत्तरप्रदेश हे आगीत होरपळून गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना समृध्दी महामार्गावर ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस कर्मचारी राठोड,पीटकर यांनी जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास समृध्दी महामार्गाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार करीत आहेत़