मादणी येथे दहा बदकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:35 IST2021-01-25T04:35:33+5:302021-01-25T04:35:33+5:30

आणखी २९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह बुलडाणा : जिल्ह्यात रविवारी २९ जणांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच ९२३ काेराेना ...

Ten ducks die at Madani | मादणी येथे दहा बदकांचा मृत्यू

मादणी येथे दहा बदकांचा मृत्यू

आणखी २९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह

बुलडाणा : जिल्ह्यात रविवारी २९ जणांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच ९२३ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाझिटिव्ह रुग्णांमध्ये चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर २, मुंगसरी १, शेलूद १, भिवगाव १, चिखली शहरातील तीन, दे. राजा शहर ३, दे. राजा तालुका सिनगाव जहागीर १, लोणार शहर २, मेहकर तालुका हिवरा आश्रम १, बुलडाणा शहरातील सात, मोताळा तालुका वडगाव ३, सि. राजा तालुका वर्दडी १, उमरद १, मूळ पत्ता जालना येथील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच ३९ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

दुचाकी चाेरट्यास अटक

बुलडाणा : दुचाकी चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ जानेवारी राेजी अटक केली. त्याच्याकडून चाेरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली. शिवशंकर संतोष गारोडे रा.चांदई, ता.चिखली असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. २१ जानेवारी राेजी बुलेट अज्ञात चाेरट्याने लंपास केली हाेती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून शिवशंकर संतोष गारोडे रा.चांदई यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Ten ducks die at Madani