तेल्हारा सरपंचांनी दिला माजी सैनिकास ध्वजारोहणाचा मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST2021-08-18T04:40:43+5:302021-08-18T04:40:43+5:30

स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक रूपराव कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. तेल्हारा येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. मारोतराव कुटे यांच्या प्रतिमेचे ...

Telhara Sarpanch honors flag hoisting of ex-servicemen! | तेल्हारा सरपंचांनी दिला माजी सैनिकास ध्वजारोहणाचा मान !

तेल्हारा सरपंचांनी दिला माजी सैनिकास ध्वजारोहणाचा मान !

स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक रूपराव कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. तेल्हारा येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. मारोतराव कुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील सेवानिवृत्त सैनिक रूपराव कुटे, अनिल गव्हले, गुलाबराव पानझाडे, प्रल्हाद ठोंबरे यांचा सैन्यातील सेवेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत स्थापनेपासून तेल्हारा गावचे सरपंचपद भूषवलेल्या सर्व माजी सरपंचांसह गावातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सरपंच माणिकराव गाडेकर, माजी सरपंच विद्या पानझाडे, माजी सरपंच विमल गाडेकर, उपसरपंच शिवकन्या कुटे, ग्रामपंचायत सदस्य बबनराव पानझाडे, मालती ठोबरे, शेख रशीद, जाधव, पोलीसपाटील शिवाजी पानझाडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष कुटे, भास्कर कुटे, अश्वमेध कुटे, शेख हबीब, जाफर पठाण, शेख गुलाब, जगदेव जाधव, लक्ष्मी ठोंबरे, संगीता ठोंबरे, मनोज कुटे, संदीप जाधव, शिवशंकर पानझाडे, ग्रामसेवक ननकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होते.

Web Title: Telhara Sarpanch honors flag hoisting of ex-servicemen!