शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

वाळू माफीयांना आवर घालण्यासाठी तहसीलदारांच्या पथकाला  मिळेना स्वतंत्र पोलीस पथकाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:22 PM

बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तरावर त्यादृष्टीने अद्याप हालचाली झालेल्या नाहीत.

ठळक मुद्देवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तहसीलदारांच्या पथकाबरोबरच तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथकाची गरज आहे.स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तरावर त्यादृष्टीने अद्याप हालचाली झालेल्या नाहीत.तहसीलदारांच्या पथकानाच जीवावर बेतून ही गौणखनीज अवैध उत्खनन व वाहतूक प्रतिबंधाची कामगीरी जीवावर बेतून पार पाडावी लागत आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तरावर त्यादृष्टीने अद्याप हालचाली झालेल्या नाहीत. तसेच या सुधारीत धोरणातही स्वतंत्र पोलीस पथकच वगळण्यात आले असल्याने वाळू माफीयांना आवर घालण्यासाठी तहसीलदारांच्या पथकाला पोलीस पथकाची साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.अवैध गौणखनिज उत्खनन दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखणे आवघड झाले आहे. राज्यभर तहसीलदारांचे पथक गौण खनिजावर डोळा ठेवून आहेत. मात्र, मागील महिन्यात अवैध उत्खननास प्रतिबंध करण्यास गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून मारण्याचा प्रयत्न आणि पथकावर दगडफेक झाली होती. या हल्ल्यामुळे राज्यभरातील पथकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे गौणखनीज विरोधासाठी सशस्त्र पोलीस पथक तालुकास्तरावर उपलब्ध करण्याची भूमीका महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून शासस्तरावर मांडण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वीही अनेकवेळा स्वतंत्र पोलीस पथक नेमण्याचा प्रश्न संघटनेकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र, हा प्रश्न शासनस्तरावर प्रलंबीतच राहत असल्याचे दिसून येत आहे. अवैध रेतीचे उत्खननामध्ये पर्यावरण संतुलन राखता यावे, अवैध रेती उत्खननाला आळा बसावा, यासाठी रेतीचे सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने आता नव्याने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तहसीलदारांच्या पथकाबरोबरच तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथकाची गरज असताना या सुधारीत धोरणातही स्वतंत्र पोलीस पथकाला स्थान मिळाले नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या पथकानाच जीवावर बेतून ही गौणखनीज अवैध उत्खनन व वाहतूक प्रतिबंधाची कामगीरी जीवावर बेतून पार पाडावी लागत आहे.रेतीचे नव्याने जाहीर केलेले सुधारीत धोरण चांगले आहे. मात्र, यामध्ये अवैध गौणखनीज उत्खननाला प्रतिबंध करण्यासाठी तहससीलदारांच्या पथकासोबत तालुकास्तरावर स्वतंत्र पालीस पथक नेमणे आवश्यक होते.- सुरेश बगळे,कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तहससिलदार व नायब तहसिलदार संघटना. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे