शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता, पदोन्नतीवर रंगले विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST2021-01-20T04:34:08+5:302021-01-20T04:34:08+5:30

डी.एड. पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसह विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पुढील योजना व शासन स्तरावरील अडचणी आणि शिक्षकांवरील अन्यायकारक बाबी सोडविण्यासाठी ...

Teachers' seniority and promotion are discussed | शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता, पदोन्नतीवर रंगले विचारमंथन

शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता, पदोन्नतीवर रंगले विचारमंथन

डी.एड. पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसह विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पुढील योजना व शासन स्तरावरील अडचणी आणि शिक्षकांवरील अन्यायकारक बाबी सोडविण्यासाठी दिशा ठरविण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा पद्मा तायडे या होत्या. प्रास्ताविक महासंघाचे सचिव बाळा आगलावे यांनी केले. सेवाज्येष्ठतेत शिक्षकांच्या वाढत्या अडचणी व उपाय याविषयी मार्गदर्शन संजय देशमुख, कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी केले. महाराष्ट्रातील खासगी शिक्षण संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या माध्यमिक विद्यालयातील डी.एड. पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीकरिता रस्त्यावरील आंदोलनाला शिक्षकांनी तयार राहावे, असा संदेश महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा पद्मा तायडे यांनी दिला. सोबतच संघटनेने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा मांडण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महासंघाचे उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ व त्यांचे सहकारी शिंगाडे यांनी परिश्रम घेतले. संचालन शिंगाडे यांनी केले. महासंघाचे उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे यांनी आभार मानले. सभेला जिल्ह्यांतील शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Teachers' seniority and promotion are discussed