शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

शिक्षकांनी स्वखर्चातून राबविला आरोग्यदायी ‘वाटर बेल’ उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:41 IST

वझर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत स्वखर्चातून ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की विविध आजार उद्भवतात. अनेक शालेय विद्यार्थी शाळेत पाणी पित नाहीत. त्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत, वझर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत स्वखर्चातून ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू केला आहे. शिक्षकांच्या दातृत्वामुळे २२६ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे.खामगाव येथून जवळच असलेल्या दुर्गम भागातील वझर येथे जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेला काही दिवसांपूर्वीच आयएसओ दर्जा मिळाला आहे. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्याना पुरेशे पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास वानखेडे, शिक्षिका ठाकूर, शिक्षक टाक, परिहार, बाहेती, मुरकुटे आणि राऊत यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना वॉटरबॅग उपलब्ध करून दिल्यात. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना वॉटर बॅग आणि इतर साहित्य उपलब्ध झाल्यानंतर शाळेत वॉटरबेल उपक्रमाला सुरूवात करण्यात आला. वझर येथील आयएसओ मानांकन प्राप्त शाळेचे अनुकरण तालुक्यातील इतरही शाळा करीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून वझर येथील शिक्षकांनी एक प्रकारे समाजासमोर नवीन आदर्शच निर्माण केल्याची चर्चा परिसरात होत आहे.

सौर उर्जायंत्रावर बेलवझर येथील विद्यार्थ्यांची आर्थिक दुर्बलता लक्षा घेता, शिक्षकांनी शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम साकार करण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमासाठी शाळेतील सर्वच शिक्षकांनी मदत केली. या वॉटर बेल उपक्रमाच्या माध्यमातून आयएसओ मानांकित वझर येथील जिल्हा परिषद शाळेत तीन वेळा बेल वाजविली जाते. बेल वाजताच विद्यार्थी पाणी पिण्यास सुरूवात करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जपणूक करण्यास मदत होणार आहे. तीनवेळा बेल वाजविण्यासाठी शाळेत सौर उर्जायंत्रावर बेल बसविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी वॉटर बेल उपक्रम फलदायी ठरणार आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळा