टँकर,मालवाहूचा अपघात; वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: June 3, 2017 01:02 IST2017-06-03T01:02:26+5:302017-06-03T01:02:26+5:30

शेगाव : शेगाव येथील खामगाव रोडवरील स्व.गजाननदादा मार्केट यार्डसमोर व टाटा कंपनीचा मालवाहू अ‍ॅपेचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १.१५ वाजता सुमारास घडली.

Tanker, cargo accident; Traffic disorder | टँकर,मालवाहूचा अपघात; वाहतूक विस्कळीत

टँकर,मालवाहूचा अपघात; वाहतूक विस्कळीत

शेगाव : शेगाव येथील खामगाव रोडवरील स्व.गजाननदादा मार्केट यार्डसमोर व टाटा कंपनीचा मालवाहू अ‍ॅपेचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १.१५ वाजता सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. अपघातानंतर काहीवेळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
गायगाव येथून पेट्रोल भरून निघालेला टँकर क्रमांक एमएच-३४/एम-४६५० शहरातून खामगाव रोडने काशेलानी यांच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल खाली करण्यासाठी स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डसमोर खामगावच्या दिशेने जात होता. त्यावेळी टाटा कंपनीच्या मालवाहू अ‍ॅपेला ट्रकची धडक लागून अ‍ॅपे ट्रकसमोर पलटी झाला. सुदैवाने टँकर ड्रायव्हर शे.खालीक शे.लाल रा.वाशिम बायपास, अकोला यांनी ट्रकचे ब्रेक वेळेवर दाबल्याने पुढील अनर्थ टळला.
मात्र, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती, त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर थोड्याच वेळात एपीआय भारती गुरुनुले, पीएसआय डी.बी. वाघमोडे यांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक सुरळीत केली व घटनेची चौकशी केली.
--

Web Title: Tanker, cargo accident; Traffic disorder