तलाठी शिवप्रसाद म्हस्के कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:39 IST2021-08-14T04:39:50+5:302021-08-14T04:39:50+5:30

यावेळी सर्व प्रथम बुलडाणा जिल्हा पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा मानपत्र व तुलशी ...

Talathi Shivprasad Mhaske honored as Corona Warrior | तलाठी शिवप्रसाद म्हस्के कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

तलाठी शिवप्रसाद म्हस्के कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

यावेळी सर्व प्रथम बुलडाणा जिल्हा पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा मानपत्र व तुलशी भेट देऊन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. त्यानंतर डोणगाव येथील तलाठी शिवप्रसाद म्हस्के आरोग्य सहायक गंगाबाई घाटोळ व ज्येष्ठ नागरिक व कोरोना योद्धयांचा सत्कार पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे हस्ते तुलशी प्राणवायू वृक्ष व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, माजी सरपंच संजय आखाडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आखाडे, माजी सभापती वनिताताई खोडके नाझिम कुरेशी, माजी सरपंच लक्ष्मणराव पाद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, माजी राज्यमंत्री सुबोध सावजी, नाझिम कुरेशी, ॲड. ए. टी. देशमुख व पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य चरण आखाडे व श्याम इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मणराव दांदडे यांनी केले. या कार्यक्रमाला डोणगाव परिसरातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

130821\20210812_182057.heic

शिवप्रसाद म्हस्के यांचा सत्कार करताना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

Web Title: Talathi Shivprasad Mhaske honored as Corona Warrior