शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

दोन हजारांची लाच घेताना तलाठी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:29 AM

बुलडाणा : भावाने घेतलेल्या शेतजमिनीची नोंद करून सात-बारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दुसरबीड येथील तलाठी संजय श्रीराम चव्हाण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले.

ठळक मुद्देबुलडाणा एसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भावाने घेतलेल्या शेतजमिनीची नोंद करून सात-बारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दुसरबीड येथील तलाठी संजय श्रीराम चव्हाण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले.दुसरबीड येथील तलाठी कार्यालयाच्या गॅलरीमध्ये  लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा कार्यालयात ७ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. त्याच्या आधारावर ८ नोव्हेंबर रोजी पडताळणीत तलाठी संजय श्रीराम चव्हाण यांनी पंचासमक्ष  लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रत्यक्ष तलाठी कार्यालयाच्या गॅलरीमध्ये दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय चव्हाण यास रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडे खैरव येथीलही अतिरिक्त कार्यभार होता.या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जवंजाळ, पोलीस नाईक दीपक लेकुरवाळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय वारूळे, समीर शेख यांनी सहभाग घेतला. लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक  सुनीता नाशिककर, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केली असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक