लाच स्वीकारताना तलाठी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:45 IST2017-08-03T01:44:30+5:302017-08-03T01:45:29+5:30

संग्रामपूर : ७/१२ व गाव नमुना नकलवर सही करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणार्‍या वरवट खंडेराव येथील तलाठी दीपक पांडुरंग चव्हाण याला संबंधित तक्रारदार शेतकर्‍याकडून एक हजाराची लाच स्वीकारताना बुधवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान संग्रामपूर बसस्थानकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.  

Talathi detained after accepting bribe | लाच स्वीकारताना तलाठी अटकेत

लाच स्वीकारताना तलाठी अटकेत

ठळक मुद्दे७/१२ व गाव नमुना नकलवर सही करण्यासाठी मागीतली लाचदोन हजार रूपयांची मागणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले

संग्रामपूर : ७/१२ व गाव नमुना नकलवर सही करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणार्‍या वरवट खंडेराव येथील तलाठी दीपक पांडुरंग चव्हाण याला संबंधित तक्रारदार शेतकर्‍याकडून एक हजाराची लाच स्वीकारताना बुधवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान संग्रामपूर बसस्थानकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.  
बोडखा येथील शेतकरी हरिभाऊ आगरकर यांचे कळमखेड शेत शिवारात गट नं.३३ मध्ये १ हेक्टर २0 आर शेत आहे. 
त्यामुळे त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्याकरिता त्या शेतीचा ७/१२ उतारा व गाव नमुना ८ अ ची आवश्यकता होती. मात्र ७/१२ व गाव नमुना नक्कलवर सही देण्याकरिता तलाठी दीपक पांडुरंग चव्हाण हे शेतकरी हरिभाऊ आगरकर यांना दोन हजारांची मागणी करीत होते. तडजोडी अंती एक हजार देण्याचे ठरले. दरम्यान, शेतकरी हरिभाऊ आगरकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने २ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात येऊन तलाठी दीपक चव्हाण वरवट (खंडेराव) वर्ग ३ याला पकडण्यात आले.  

Web Title: Talathi detained after accepting bribe