३०० रुपयांची लाच घेताना तलाठी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 17:34 IST2021-02-22T17:34:11+5:302021-02-22T17:34:21+5:30
Talathi Arrested While taking bribe विहीरीची नाेंद करण्यासाठी तलाठी निलेश शरद जाधव याने ५०० रुपयांची लाच मागितली.

३०० रुपयांची लाच घेताना तलाठी गजाआड
बुलडाणा : ३०० रुपयांची लाच घेताना हिवरखंड येथील तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ फेब्रुवारी राेजी गजाआड केले. निलेश शरद जाधव असे आराेपी तलाठ्याचे नाव आहे.
लाेणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील २८ वर्षीय महिला शेतकऱ्याला शेतीच्या सातबाऱ्यावर विहीरीची नाेंद करण्यासाठी तलाठी निलेश शरद जाधव याने ५०० रुपयांची लाच मागितली. महिला शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्यने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तलाठ्याची तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तडजाेडी अंती तलाठी निलेश जाधव याने ३०० रुपयांची लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी तलाठी जाधवविरुद्ध बिबी पाेलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू हाेती. ही कारवाइ पाेलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपअधिक्षक संजय चाैधरी, पाेलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, पाेलीस नाइक साखरे, बैरागी, विनाेद लाेखंडे, स्वाती वाणी,चालक रगड आदींनी केली आहे.