वाचन चळवळ गावागावात पोहचवा: गरकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:33 IST2021-03-21T04:33:16+5:302021-03-21T04:33:16+5:30

मेहकर: वाचन संस्कृती जपण्याची गरज आहे. त्यासाठी वाचन चळवळ गावागावात पोहचवा, असे आवाहन तहसीलदार संजय गरकल यांनी केले. तहसीलदार ...

Take the reading movement to the villages: Garkal | वाचन चळवळ गावागावात पोहचवा: गरकल

वाचन चळवळ गावागावात पोहचवा: गरकल

मेहकर: वाचन संस्कृती जपण्याची गरज आहे. त्यासाठी वाचन चळवळ गावागावात पोहचवा, असे आवाहन तहसीलदार संजय गरकल यांनी केले. तहसीलदार संजय गरकल हे गुरुवारी चिंचोली बोरे येथे वाचन चळवळीवर चर्चा करताना बोलत होते.

साहित्यिक विनोद बोरे यांच्याशी वाचन चळवळीबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी बोरे यांच्या जिजाऊ निवासस्थानातील स्वप्नपूर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तहसीलदार गरकल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या भागात सकारात्मक विचारांची चळवळ असणे गरजेचे होते. युवक उद्योग-व्यवसाय-अभ्यास किंवा मेहनतीकडे वळण्यासाठी प्रचंड ताकदीचे विचार अन् तेही उदाहरणांसह पुस्तकरुपात समाजासमोर मांडणे गरजेचे होते. हे काम बोरे यांच्याकडून झाल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार गरकल यांनी नारायणराव बोरे, गोदावरी बोरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी सरपंच पती अनंथा बोरे, शेतकरी सुभाषराव बोरे, अर्चनाताई बोरे, प्रमोद बोरे, गणेश बोरे, पवन सातपुते यांची उपस्थिती होती.

Web Title: Take the reading movement to the villages: Garkal