पर्यावरणरक्षणाची कास धरा : मीनल गावंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:35+5:302021-08-28T04:38:35+5:30
स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा.नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना द्वारा पर्यावरणपूरक रक्षाबंधन कार्यक्रम ...

पर्यावरणरक्षणाची कास धरा : मीनल गावंडे
स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा.नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना द्वारा पर्यावरणपूरक रक्षाबंधन कार्यक्रम मोजक्या विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्या बोलत्या होत्या. प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गृह अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.मीनल गावंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.दुतोंडे व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पोपळघट, समन्वयक प्रा.डॉ.विशाल पानसे उपस्थित होते. प्रा.डॉ.मीनल गावंडे यांनी वर्तमान परिस्थितीत पर्यावरणरक्षणाची गरज व्यक्त करून रासेयोद्वारे आयोजित या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रा.डॉ.पानसे यांनी विद्यार्थी विकासासाठी अशा स्तुत्य कार्यक्रमाची गरज व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा.डॉ.दुतोंडे, सूत्रसंचालन प्रा.डॉ.सागर गवई यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.पोपळघट यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरणरक्षणाची शपथ
कोरोना संसर्गामुळे मोजक्याच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली राख्यांचे वितरण करून पर्यावरणरक्षणाची शपथ देण्यात आली.