आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:40+5:302021-06-01T04:25:40+5:30

सागर शेळके यांनी पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दत्तात्रय शेळके यांनी गावातील काही लाेकांकडून व्याजाने पैसे घेतले हाेते़ ...

Take action against those who incite suicide | आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करा

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करा

सागर शेळके यांनी पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दत्तात्रय शेळके यांनी गावातील काही लाेकांकडून व्याजाने पैसे घेतले हाेते़ हे पैस परत देण्यासाठी ते दत्तात्रय शेळके यांना धमक्या देत हाेते़ १५ मे राेजी दत्तात्रय शेळके यांना एका शेतात बाेलावण्यात आले़ तेथे व्याजाने पैसे देणारे व इतर काहीजण उपस्थित हाेते़ त्यांनी व्याजाने घेतलेल्या पैशांची मागणी केली़, तसेच शिवीगाळ करून मारहाण केली़ एका महिलेने त्यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार पाेलिसात दिली़ या तक्रारीवरून पाेलिसात गुन्हा दाखल झाल्याने दत्तात्रय शेळके यांचे मानसिक संतुलन बिघडून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सागर शेळके यांनी २६ मे राेजी चिखली पाेलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे़

Web Title: Take action against those who incite suicide