पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पाेलिसांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:33+5:302021-07-04T04:23:33+5:30

अमडापूर : धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या इरला सिंधी फाटा मराठवाड्याच्या हद्दीत ३० जून रोजी जुगार ...

Take action against Paelis for beating journalists | पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पाेलिसांवर कारवाई करा

पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पाेलिसांवर कारवाई करा

अमडापूर : धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या इरला सिंधी फाटा मराठवाड्याच्या हद्दीत ३० जून रोजी जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा टाकला हाेता़ यावेळी बातमी संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पाेलिसांनी मारहाण केली हाेती़ पत्रकारांना मारहाण करणाऱ्या पाेलिसांवर कारवाई करण्याची मागणी अमडापूर येथील ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे़

दि. ३० जून रोजी इथल्या सिंधी फाट्यावर मराठवाडा हद्दीत सुरू असलेल्या जुगारावर पाेलिसांनी छापा टाकला हाेता ही माहिती घेण्यासाठी पत्रकार गजानन महाराज मरमट, शेख मजहर, नदीम शेख, दीपक जाधव हे गेले हाेेते़ तेथे पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना शिवीगाळ करून मोबाईल हिसकावून घेतले़ तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या कर्मचाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी, अशी मागणी अमडापूर, इसोली, उंद्री ग्रामीण पत्रकार संघटनेचे वसंतराव शिरसाट, संजय रसाळ, प्रताप कौसे, संजय गाडेकर, ज्ञानेश्वर वाकडे, शेख रफिक, आदींनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ पत्रकारांनी अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण सोनवणे यांना निवेदन दिले़

Web Title: Take action against Paelis for beating journalists