जमीन महसूल नोंदणीचे अधिकार तहसीलदारांकडे
By Admin | Updated: July 31, 2014 01:30 IST2014-07-31T01:05:12+5:302014-07-31T01:30:39+5:30
बुलडाणा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांची माहीती.

जमीन महसूल नोंदणीचे अधिकार तहसीलदारांकडे
बुलडाणा : शेतक-यांनी धारण केलेल्या शेतजमीनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमीनीतील हिश्शाचे विभाजनाकरीता जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करण्याची तरतुद महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १0६६ च्या कलम ८५ मध्ये आहेत. आता जिल्हाधिकारी यांचे अधिकार संबधित तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली.
महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १0६६ मधील तरतुदींच्या बाहेर जाऊन नोंदणीकृत वाटपपत्र असल्याशिवाय वाटणी व विभाजन करण्यात येत नसल्याने शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली करण्याचे उद्येशाने महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन परिपत्रकान्वये १६ जुलै अन्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार हिंदु एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होवून सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण या संट्ठोखाली येत नसल्यामुळे वाटणी पत्राची नोंदणी करणे सक्तीचे नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ मधील तरतुद आणि उच्च न्यायालय ,नागपूर खंडपीठ यांचेकडे वरील याचिका मध्ये दिलेले आदेश पहाता शेतक-यांनी धारण केलेल्या शेतजमीनमध्ये एकाहून अधिक सहधारक असतील तर अशा धारण जमीनीतील विभाजनाकरीता तहसिलदार यांचे कडे अर्ज केल्यास, त्याप्रसंगी संबधित सहधारकाडे नोदणीकृत वाटप पत्रांची मागणी करण्यात येवु नये.