स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत खड्ड्यात गाडून घेऊन आत्मक्लेश आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:34 AM2018-12-19T10:34:30+5:302018-12-19T11:45:57+5:30

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्‍लेश आंदोलन केले. 

Swabhimani workers agitation for farmer | स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत खड्ड्यात गाडून घेऊन आत्मक्लेश आंदोलन

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत खड्ड्यात गाडून घेऊन आत्मक्लेश आंदोलन

Next

- नारायण सावतकर
बुलढाणा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्‍लेश आंदोलन केले. या वर्षी शासनाने दुष्काळ घोषित केला असला तरी दुष्काळाच्या उपाययोजना अजून जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील स्मशानभूमीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता स्वतःला जमिनीत गाडून घेतले. आंदोलनावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतक-यांची  उपस्थिती होती. शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुकाध्यक्ष उज्ज्वल चोपडे, सुनील अस्वार, विलास तराळे, योगेश मुरुख, शिवा पवार, गोपाल वसतकार, प्रकाश भगत, संजय बोरवार, सुखदेव अमझरे, रमेश नांदने, सागर खानझोड, सागर डोंगरे, दादाराव जाधव, सोपान कुरवाळे सह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Swabhimani workers agitation for farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.