औरंगाबाद-नागपूर महामार्गावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा 'रास्ता रोको'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 17:50 IST2019-01-02T17:50:12+5:302019-01-02T17:50:37+5:30
मेहकर: तुरीचे अनुदान आणि दुष्कळी पॅकेजची मदत त्वरित देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सलग दुसऱ्या दिवशी मेहकरमध्ये रास्ता रोको करण्यात आला.

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा 'रास्ता रोको'
मेहकर: तुरीचे अनुदान आणि दुष्कळी पॅकेजची मदत त्वरित देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सलग दुसऱ्या दिवशी मेहकरमध्ये रास्ता रोको करण्यात आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा रास्ता रोको करण्यात आला. स्वाभीमानीचे ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात खंडाळा बायपास येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात वाशिमचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा इंगोले, सुभाष पवार, अनिल बोरकर, नितीन अग्रवाल, अनिलढोकळ, अमोल खंडारे, गजानन मेटांगळे, विशाल जाधव, सुरेश गायकवाड, प्रदीप मोरे, सतीश वाघ, अरविंद पिसे, उत्तमराव खरात, मिथून साळवे यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी तुरीचे चुकारे मिळावे या मागणीसाठी २६ डिसेंबर २०१८ पासून शेगाव तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्याची आठ दिवसानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात येत आहे. मंगळवारी तीन ठिकाणी एसटी बसच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मेहकर येथे खंडाळा बायपासवर औरंगाबाद-नागपूर मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावर बराचकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत ही वाहतूक सुरळीत केली.