शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फासले सेंट्रल बँकेला काळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:23 IST

मलकापूर : पिककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या  सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शनिवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाताळ्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या स्थानीय शाखेस काळे फासले.

ठळक मुद्दे शेतकऱ्याच्या पत्नीस पिक कर्जासाठी बँक व्यवस्थापकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.त्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी दाताळ्यात गदारोळ माजवीला.सेंट्रल बँकेच्या शाखेस काळे फासण्यात आले. व बोर्डाची तोडफोड करण्यात आली.

मलकापूर : पिककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या  सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शनिवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाताळ्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या स्थानीय शाखेस काळे फासले. तसेच बोर्डाचीही मोडतोड केली. या आंदोलनात सहभागी होवून शेतकरी संघटनेनेही समर्थन दिले. ६० कार्यक़र्त्यांना ग्रामीण पोलीसांनी स्थानबध्द केले. गुरुवारी तालुक्यातील मौजे उमाळीतील शेतकऱ्याच्या पत्नीस पिक कर्जासाठी बँक व्यवस्थापकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी दाताळ्यात गदारोळ माजवीला. सेंट्रल बँकेच्या शाखेस काळे फासण्यात आले. व बोर्डाची तोडफोड करण्यात आली.या घटनेची वार्ता कळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक बी.आर.गावंडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वाभीमानीचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुसार, पश्चिम विदर्भप्रमुख चंद्रशेखर चंदन, विधानसभा प्रमुख शशीकांत संबारे, अमोल राऊत, विवेक पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष दामोधर शर्मा, पुंजाजी देवीकार, प्रदीप शेळके, सुनिल पाटील आदीसह ६० जणांना स्थानबध्द केले. या आंदोलनाला शेतकरी संघटनेने समर्थन दिले.

 राष्ट्रवादीचे पोलीसांना निवेदन !मलकापूर तालुक्यात पिक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारी बाब संतापजनक असल्याच्या धरतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पक्षनेते संतोषराव रायपुरे यांच्या नेतृत्वात या घटनेचा निषेध करण्यात आला व कडक कारवाई तथा आरोपींना तात्काळ अटकेची मागणी पोलीस निरीक्षक बि.आर.गावंडे यांच्याकडे करण्यात आली. या निवेदनावर संतोषराव रायपुरे, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, शहराध्यक्ष शाहीद शेख, पं.स.सदस्य सुरेश पाटील, पुरुषोत्तम रायपुरे, बबनराव तायडे, संदीप गायकवाड, सुखदेव चांदेलकर आदीसह असंख्य सह्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरbankबँकSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना