चारित्र्यवर संशय घेऊन पतीने केले पत्नीच्या गळ्यावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:12+5:302021-08-24T04:39:12+5:30

ढालसावंगी येथील उषा संदीप बोरकर (२७) ही माहेरी चिखला येथे आली होती. २२ ऑगस्टला रात्री तिचा पती संदीप सखाराम ...

Suspicious of character, the husband stabbed his wife in the neck | चारित्र्यवर संशय घेऊन पतीने केले पत्नीच्या गळ्यावर वार

चारित्र्यवर संशय घेऊन पतीने केले पत्नीच्या गळ्यावर वार

ढालसावंगी येथील उषा संदीप बोरकर (२७) ही माहेरी चिखला येथे आली होती. २२ ऑगस्टला रात्री तिचा पती संदीप सखाराम बोरकर (३५) सुद्धा सासरवाडीत आला. रात्री ११ च्या सुमारास दोघा पती-पत्नीत वाद झाला. पती सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून वाद सुरू होताच. संदीपने उषाच्या गळ्यावर कटरने सपासप वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. माहेरच्या लोकांनी तिला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी विवाहितेचा भाऊ सुनील संदीप गायकवाड (२०, रा. चिखला) याने या प्रकरणाची तक्रार बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून तिचा पती संदीप सखाराम बोरकर याच्याविरुद्ध सोमवारी पहाटे ग्रामई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Suspicious of character, the husband stabbed his wife in the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.